Thursday, September 23, 2021

 23rd September:

Satisfactory position. Video sent by farmer ( Sonne Shyam) from Phulambari Taluka, Aurangabad, Marathwada. 


After two low pressure systems from the bay, BB 11 & BB 12 another coming  BB 13, to Odisha around 25th.

Will move across central india and northern Maharashtra next week. 

Monsoon withdrawal from West Rajasthan delayed by about 10 - 15 days, around first week of October. Maharashtra monsoon rains till at least 10-13th October.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले २ कमी दाबाचे क्षेत्र ओदिशा किनारपट्टीवर धडकले, मात्र आता पुन्हा एक कमी दाबाचे क्षेत्र साधारण २५ सप्टेंबर रोजी ओदिशा किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे कमी दाबाचे क्षेत्र भारताच्या मध्य भागा जवळ तसेच महाराष्ट्राच्या उत्तर भागातून सरकेल. त्यामुळे अरबी समुद्रातून देखील बाष्प खेचले जाईल व महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचे प्रमाण वाढू शकते. 

मान्सूनचा परतीचा प्रवास पश्र्चिम राजस्थानातून साधारण १०-१५ दिवस लांबला असून साधारण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पश्र्चिम राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मात्र जवळपास १०-१३ ऑक्टोबर पर्यंत मान्सूनचा पाऊस राहण्याची शक्यता आहे.

Marathi compilation by Vagarian Shreyas. 


No comments:

  ISRO’s satellite imagery shows significant expansion of glacial lakes in Indian Himalayan river basins, aiding in climate change adaptatio...